| अलिबाग | प्रतिनिधी |
पेणकडून अलिबागकडे जाणारी एसटी बस बंद घराला धडकली. बसचा ब्रेक फेल झाल्याने एसटी चालकाने सुरक्षेच्या दृष्टीने बस दुसऱ्या बाजूला वळवून प्रवाशांचा जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे होणारी मोठी दुर्घटना टळली असल्याचे बोलले जात आहे. मात्र, घराचे प्रचंड नुकसान झाले. ही घटना सोमवारी (दि. 28) सकाळी घडली.
अलिबाग एसटी बस आगारातील बस पनवेलहून अलिबागकडे येत होते. मात्र अचानक तिचा ब्रेक फेल झाला. कार्लेखिंड येथील चढावावरून उतरणीवर येत असताना अपघात होण्याची भिती निर्माण झाली होती. अखेर एसटी चालकाने सतर्कता दाखवत सागावजवळ डाव्या बाजूला वाहन वळवून चढणावर घेतले. परंतु समोर असलेल्या बंद घराला बसची जोरदार धडक लागली असल्याचे बोलले जात आहे. या धडकेत घराचे नुकसान झाले. चालकाने सतर्कता दाखविल्याने एसटीतील प्रवासी बचावले. परंतु, सागावमधील थळे यांच्या घराची भिंत कोसळली.
एसटीची घराला धडक
