जेएनपीटी | वार्ताहर |
उरण तहसील कार्यालय आणि उरण पोलीस ठाण्या लागत असलेली बांधकाम विभागाची इमारत खंडर बनली आहे. त्यामुळे तिथे सापांचा वावर वाढल्यामुळे कामानिमित्त येणार्या जनतेच्या आणि कार्यालया मधील कामगारांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिपत्याखाली उरण तहसील कार्यालगत असणार्या इमारती मध्ये इंग्रज राजवटीत शासकीय कार्यालयाचे कामकाज सुरू होते. मात्र त्यानंतर तेथील अनेक वर्षांपासून कार्यालयांचे कामकाजू बंद असल्यामुळे इमारत मोडकळीस येऊन बंद स्थितीत आहे. इमारतीचे दरवाजे खिडक्या नाहीशा झाल्या आहेत आजूबाजूला संपूर्ण गवत वाढले आहे.त्यामुळे सदर इमारती परिसरात उंदीर खुशीचा वावर वाढून संपूर्ण परिसर पोखरून काढला आहे. इमारत संपूर्ण खंडर बनली आहे.यामुळे या परिसरात सापांचा वावर वाढला आहे .बाजूलाच उरण तहसील कार्यालय आणि उरण पोलीस ठाणे आहे.
दिवस गणित हजारो नागरिकांचा वावर या दोन्ही कार्यालयामध्ये होत आहे .येणारा नागरिक पार्किंग साठी येथे वाहने उभी करत असतात त्या वाहनांमध्ये ही साप घुसण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेचे या कार्यालमधील कर्मचारी काम करीत असताना कामामध्ये मग्न असतात याच वेळेला खिडकीतून साप जाऊन कर्मचार्यांच्या जीवितास धोका निर्माण करु शकतात.त्यामुळे या खंडर झालेल्या कार्यालयाचे डीमोलेशन करुन परिसराची स्वच्छता करावी अशी मागणी नागरिक कर्मचारी करीत आहेत.