नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
महाराष्ट्रात बैलगाड्यांच्या शर्यती पुन्हा सुरु करण्याबाबत शासन कटिबद्ध असल्याचा दावा,पशुसंवर्धन,दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी केला आहे.
बैलगाडी शर्यत सुर करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली आहे.या संदर्भात वरिष्ठ अभियोक्ता,सरकार वकील यांच्याशी चर्चा करण्यासाठी केदार हे दिल्लीत आलेले आहेत.यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली.शर्यती पुन्हा सुरु करण्याबाबत 2017 मध्ये एक कायदा संमत झालेला आहे.तथापि मुंबई उच्च न्यायालयाने या कायद्याला स्थगिती दिली त्या स्थगितीला राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलेले आहे.ते प्रकरण विस्तारित बेेचकडे प्रलंबित असून.आठवडाभरात त्यावर सुनावणी अपेक्षित आहे,असे केदार यांनी सांगीतले.
पंजाब,तामिळनाडू,कर्नाटक,मध्यप्रदेश,आंध्रप्रदेश,गुजरात,छत्तीसगड आदी राज्यात आजही बैलगाड्यांच्या स्पर्धा होतात.मात्र उच्च न्यायालयाच्या स्थगितीमुळे महाराष्ट्रात ही स्पर्धा होत नाही,असे ते म्हणाले.राज्यात या स्पर्धेला 400 वर्षांची जुनी परंपरा आहे,असेही त्यांनी निदर्शनास आणले.