भरत गोगावले यांची कबुली
। अलिबाग । प्रतिनिधी |
मंत्री म्हणून शासनाच्या माध्यमातून वेगळे काही करता येईल याचा विचार सुरू आहे. सध्या लाडक्या बहिणीचा बोजा आहे. त्याला बगल देऊन अपघातग्रस्तांसाठी मदत करणारे पोलीस व इतर सर्वांसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे मत रोजगार हमी, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी केले. यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेचा आर्थिक बोजा असल्याचे कबूल केले.
रायगड पोलिसांमार्फत रस्ता सुरक्षा जीवनदूत सन्मान सोहळा शुक्रवारी (दि.24) आरसीएफ क्रीडा संकुलातील सभागृहात आयोजित करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.अपघात झाल्यावर तडफड विचित्र असते. देवदूताप्रमाणे वेगवेगळ्या संस्थेतील सदस्य काम करतात. त्यांच्यासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करू. स्वतःचा जीव धोक्यात घालून अपघातग्रस्तांना वाचविण्याचे काम ही मंडळी करतात, असे जीवनदूतांचे कौतुक करीत भरत गोगावले पुढे म्हणाले, “आम्ही चुकलो तर चार पावले मागे येऊ. जे बोलू ते योग्य बोलू. चुकलो नाही, तर तिथे कमी पडणार नाही,’’ असा टोला खासदार सुनील तटकरे यांना नाव न घेता लगावला.