| पनवेल | प्रतिनिधी |
मुंबई -पुणे द्रुतगती महामार्गावर सोमवारी (3 जुलै) सकाळी पनवेल तालुक्यातील भाताण परिसरात भरधाव कार पलटी होऊन ती खड्ड्यात पडल्याने झालेल्या अपघातात 1 ठार तर 4 जण जखमी झाले आहेत.
टाटा सफारी ( एमएच 11 बीएच 3173) वरील चालक तुषार महानवर हा कार घेऊन जात होता. ती झाल्याने त्याचा कारवरील ताबा सुटला.त्या कारची शोल्डर लेनच्या रेलिंगला ठोकर लागली. त्यानंतर खड्ड्यात जाऊन पलटी झाली. या अपघातामध्ये कारमधील प्रवासी उज्वला धडस (वय 47) या मयत झाल्या. तर इतर प्रवासी प्राजक्ता धडस (वय 26), वैभव धडस (वय 29), रामचंद्र धडस (वय 57) व कारचालक तुषार महानवर हे गंभीर जखमी झाले आहेत.