जिल्हाधिकार्‍यांनी केली मतदान केंद्राची पहाणी

। म्हसळा । वार्ताहर ।

निवडणूक निर्णय अधिकारी रायगड लोकसभा मतदारसंघातील ग्रामिण भागातील मतदान केंद्राना जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी किशन जवळे यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन मतदान केंद्राची पाहणी करून सुविधा उपलब्धतेबाबत सूचना दिल्या.

जिल्हाधिकारी रायगड यांनी नुकतीच 193-श्रीवर्धन विधानसभा मतदार संघांमधील म्हसळा तालुक्यातील 233- घोणसे मतदान केंद्राची पाहणी केली व मार्गदर्शन केले. तसेच अंजुमन इस्लाम जंजिरा हायस्कूलमध्ये रिक्षा व मिनीडोर संघटनेचे चालक यांना मतदान जनजागृतीच्या स्टिकर्सचे वाटप करून मतदान टक्का वाढविण्यासाठी आवाहन केले. याप्रसंगी त्यांच्या समवेत उपविभागीय अधिकारी श्रीवर्धन महेश पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.विवेक मुगळीकर, म्हसळा तहसीलदार समीर घारे, तहसीलदार श्रीवर्धन महेंद्र वाकलेकर, तहसीलदार तळा स्मिता पाटील, निवासी नायब तहसीलदार म्हसळा गणेश तेलंगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हसळा पवन चौधरी, मंडळ अधिकारी सलीम शहा, ग्रामस्थ, रिक्षा व मिनिडोर संघटनेचे पदाधिकारी व रिक्षा चालक उपस्थित होते.

Exit mobile version