पोलिसांकडून कारवाईची अपेक्षा
। उरण । वार्ताहर ।
वाढती व्यसनाधीनता हा समाजातील चिंतेचा विषय आहे. याला आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणा प्रयत्न करत आहे. मात्र, तरीदेखील व्यसनांचा विळखा कमी होण्याऐवजी वाढतच आहे.
पान हे आरोग्यासाठी पोषक असल्याचे सर्वानुमत आहे. परंतु, याच पानाचा अमली पदार्थांच्या सेवनासाठी दुरूपयोग केला जात आहे. पानात अमली पदार्थ टाकून नशा करण्याचा फंडा अलीकडे वाढला आहे. तरुणाई या पानाकडे खेचली जात आहे. त्यात प्रतिबंधित पानमसाले व पावडरचा वापर करून पान बनविले जात असल्याचे उघड झाले आहे. तरुणाईत या पानाची क्रेझ वाढली आहे. या व्यसनापासून त्यांना वेळीच आवरणे गरजेचे आहे, अन्यथा त्यांचे आयुष्य बेरंग होऊ शकते. यासाठी पालकांनी दक्ष राहणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे. तसेच अशा पानांची विक्री करणार्यांनाही आळा बसणे गरजेचे आहे. यासाठी पोलिसांनी अशा पान टपरीवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.