। रसायनी । वर्ताहर ।
रसायनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भोकरपाडा येथील हिरानंदानी फॉर्चुन सीटी हा सर्वात मोठा गृहप्रकल्प सूरू आहे. या वसाहतीत राहण्यासाठी तयार झालेल्या सदनीकांमध्ये नागरिक वास्तव्य करत असून गृह प्रकल्पाचे उर्वरीत काम जोमाने सूरू आहे. या गृह प्रकल्पातील सदनीकाधारकांना सांडपाणी देखील वापरात यावे, याकरीता हिरानंदानी फाँर्चुन सीटी यांनी एसटीपी प्लॅन्ट बसवून सांडपाण्यावर प्रक्रिया करत असल्याचे निदर्शनास येत आहे. प्रकिया केलेले सांडपाणी सदनिकेतील टॉयलेट फ्लशिंगसाठी, वसाहतीतील झाडांसाठी तसेच परिसरातील धुळ प्रदुशन रोखण्यासाठी परिसरातील रस्त्यावर पाणी शिंपडण्यासाठी हे पाणी वापरणार असल्याची माहिती मिळत आहे.