प्रा. रुक्सार महाडकर प्रतिपादन
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या शेठ ज.नौ. पालीवाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधाकर लहूपचांग यांच्या मार्गदर्शनाने व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या माध्यमातून भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा झाला. यावेळी प्राध्यापिका रुक्सार महाडकर यांनी संविधानाचे महत्त्व उपस्थितांना सांगितले. त्या म्हणाल्या की, 26 नोव्हेंबर संविधान दिन हा प्रत्येक भारतीय नागरिकासाठी अभिमानाचा दिवस आहे. कोणताही देश संविधानाशिवाय चालू शकत नाही. भारतातील विविध धर्म आणि जातींच्या 140 कोटी लोकसंख्येला एक देश म्हणून एकत्रित करणारी ही राज्यघटना आहे. राज्यघटनेतच देशाची तत्त्वे आणि ती चालवण्याच्या पद्धती आहेत.
यावेळी महाविद्यालयातील उपस्थित प्राध्यापक, प्राधापकेत्तर कर्मचारी यांनी भारताचे संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनाचे कार्यक्रम अधिकारी तथा अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अनिल झेंडे यांनी केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष वनस्पती शास्त्र विभाग प्रमुख प्रा.यू.बी. इनामदार यांनी भूषवले. यावेळी इतिहास विभाग प्रमुख प्रा. अंकुश सोहनी, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. स्नेहल बेलवलकर, भूगोल विभाग प्रमुख तथा रासेयोचे कार्यक्रम अधिकारी एस. ए.पाटील, परीक्षा विभाग प्रमुख प्रा. एन.एन. पाटील, प्रा.एस एस खैरनार, वाणिज्य विभागाचे प्रा. संतोष भोईर, प्रा. विशाखा मानकामे, प्रा. सरिता देशमुख, प्रा. संदेश गावडे, प्रा. भक्ती साजेकर, प्रा. श्रद्धा भोईर, प्रा. दिपाली बांगारे, प्रा. हर्षिता घोसाळकर, प्रा. महेश राहीन्ज, प्रा. मधुजीत नायकवडी तसेच प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजल म्हात्रे व आभार प्रदर्शन ग्रंथालय प्रमुख तथा राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी एल.बी. उके यांनी केले.







