पनवेलमध्ये चेंबरची झाकणे बदलली

पनवेल । वार्ताहर ।
मुख्य रस्त्यावर असलेले चेंबरची झाकणे तुटलेल्या अवस्थेत असल्याने यंदाच्या पावसात पाणी साठून ते नजरेला दिसत नसल्याने तेथे अपघात घडत होते. या संदर्भात स्थानिक रहिवाशांनी या समस्येची माहिती नगरसेवक राजू सोनी यांना देताच त्यांनी तातडीने आपल्या सहकार्‍यांना पाठवून सदर चेंबरची झाकणे बदलून घेतली आहेत. शहरातील रोहिदास वाडा कानिफनाथ मंदिरा जवळील रस्त्यावर खुप दिवसापासून चेंबरचे झाकण तुटलेल्या अवस्थेत होते. याबाबतची माहिती नगरसेवक राजू सोनी यांना स्थानिकांनी देताच त्यांनी त्यांचे सहकारी मंदार देसाई यांना त्या ठिकाणी पाठवून तसेच कामगार वर्गाला पाठवून त्यांच्या सहाय्याने ते तुटलेले झाकण काढुन त्या जागी नवीन झाकण बसवून घेतले. याबद्दल परिसरातील नागरिकांनी धन्यवाद दिले आहेत.

Exit mobile version