आक्षीच्या खाडीत सापडला मृतदेह

| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील नागाव आक्षी खाडीत सोमवारी (दि.24) एका इसमाचा मृतदेह सापडला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून मृतदेहाची अद्याप ओळख पटली नसल्याची माहिती अलिबाग पोलिसांनी दिली. आक्षी येथील पुलाजवळील खाडी नजीक फिरत असताना स्थानिकांना एका पुरूषाचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती अलिबाग पोलिसांना मिळताच सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास पोलीस निरीक्षक संदिप बागुल यांच्यासह त्यांच्या टीमने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचे ओळखीचे पुरावे आढळून आले नाही. त्या मृत इसमाचे वय अंदाजे 45 असून तो कामगार असल्याचे प्राथमिक अंदाजानुसार लक्षात येत आहे. मृत इसमाच्या नातेवाईकांचा शोध घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Exit mobile version