कुंभार समाज लागला कामाला
| उरण | वार्ताहर |
सध्या मातीच्या भांड्यात शिजवलेले अन्न पदार्थ खाण्याकडे नागरिकांनी आपला मोर्चा वळवला आहे. त्यामुळे माती पासून बनवलेल्या भांड्याना मागणी वाढली आहे. याचा फायदा उठवत चिरनेर गावातील कुंभार समाजाच्या बांधवांनी मातीची भांडी बनविण्यात गर्क असल्य़ाचे चित्र पहावयास मिळत आहे. चिरनेर या इतिहास प्रसिद्ध गावात कुंभार समाजाची 32 कुटुंब हि पिढ्यानपिढ्या वास्तव करत आहेत. या समाजाचे उध्दरनिर्वाच मुख्य साधन म्हणजे शाडूच्या मातीपासून मूर्ती बनविणे आणि नागरीकांना संसारासाठी आवश्यक असणारी शेत जमीनील मातीपासून भांडी बनविणे हे आहे. परंतु आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात हळूहळू मातीच्या भांड्याची मागणी कमी कमी होत गेल्याने कुंभार समाजांवर त्याचा परिणाम झाला. तरी ही कुंभार समाजाच्या बांधवांनी आपला पिढ्यानपिढ्याचा व्यवसाय आजही सुरू ठेवला आहे.
मात्र आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात गॅसवर तसेच स्टिलच्या भांड्यात शिजवलेल्या अन्न पदार्थाल चविष्ट नसल्याने व सदर शिजवलेले अन्न हे शरीराला ऊर्जा देणारे नसल्याने नागरिकांनी चूलीवर, मातीच्या भांड्यात शिजवलेल्या अन्न पदार्थाला जास्त पसंती दर्शविली आहे. तसेच वाढत्या उष्णतेत घागर, मडक्यामधील पाणी पित आहे. एकंदरीत मातीच्या भांड्याना मागणी वाढली असल्याने चिरनेर गावातील कुंभार बांधवांनी भाकरीसाठी आवश्यक असणारी खापरी, मटन किंवा मासळी बनवायला तवी, जोगळ्या, भिन, पाण्यासाठी घागर ( मडका) सह विविध प्रकारची मातीची भांडी बनवून ती भांडी पेढ्यात भाजून नंतर ती भांडी विक्रीसाठी ठेवली आहेत.श्री महागणपती देवस्थानाच्या भेटीला, दर्शनासाठी ये- जा करणारे मुंबई, नवीमुंबई, ठाणे,पनवेल परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने कुंभार बांधवांनी बनविलेली भांडी खरेदी करण्यासाठी आपली पसंती दर्शवित आहे.
नंदकुमार चिरनेरकर
शासनाने मातीच्या भांड्याची कला जिवंत ठेवणाऱ्या चिरनेर गावातील कुंभार बांधवांना आर्थिक मदत म्हणून शासकीय योजनांचा लाभ द्यावा.
कुंभार समाजाचे ज्येष्ठ नागरिक
