। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग प्रेस असासिएशनतर्फे तेजस्विनी पुरस्कार 2025 जाहीर करण्यात आले आहेत. अंकिता उल्हास राऊत, मिलन कृष्णा राणे, मोनिका मोहन औचटकर, रुचिका विलास शिर्के, प्रियांका संदेश गुंजाळ यांची तेजस्विनी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.7) पुरस्कार वितरण सोहळा सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास राजस्व सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, अलिबाग येथे होणार आहे.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्या परंतु प्रसिध्दीपासून दूर असलेल्या कर्तृत्ववान महिलांना अलिबाग प्रेस असोसिएशनतर्फे जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून दरवर्षी तेजस्विनी पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. कलाक्षेत्रात काम करणार्या अंकिता राऊत, कृषि क्षेत्रातून मिलन राणे, वीजजोडणी विभागात कामकरणार्या मोनिका औचटकर, आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील रुचिका शिर्के, क्रीडा क्षेत्रात काम करणार्या प्रियांका गुंजाळ यांची तेजस्विनी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे.