मध्य रेल्वेचे फाटक उडवून चालक फरार

। नेरळ । वार्ताहर ।
नेरळ शहराला पूर्व पश्‍चिम जोडणारा मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर फाटक आहे. 10 जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास टेम्पो पिकअप कार चालकाने उडवून कार चालक फरार झाला. दरम्यान हा गेट नादुरुस्त झाल्याने रेल्वेच्या गेटमनने रेल्वे सेवा सुरक्षित ठेवण्यासाठी गेट बंद केले होते. परंतु पर्यायी मार्गाचा वापर अवलंबला करावा लागणार्‍या वाहनचालकांना येथील अडचणींचा सामना करावा लागला याचा परिणाम म्हणून लांबच लांब येथे वाहतूक कोंडी झाली होती. मध्य रेल्वेच्या माध्यमातून नागरिकांच्या सुरक्षितेसाठी रेल्वे फाटक घालण्यात आले आहे. परंतु नेहमीच येथे रेल्वे क्रॉस होत असताना गेट लागले असता वाहनचालकाला या ट्रॅफिक जामचा सामना करावा लागतो. अर्ध्यातासाहून ही अधिक काळ अडकून पडावे लागते. त्यामुळे वाहन चालकाने तर रेल्वेचा गेट उडवला, आणि कारवाईपासून वाचण्यासाठी वाहन चालकाने घटना स्थळहून धूम ठोकत चालक फरार झाला. सदर घटनास्थळी उपस्थितीत असलेला गेटमनने या कार चालकाचा समोरून मोबाईलमध्ये फोटो कैद केली आहे. याबाबत अधिकारी वर्गाला बोलावून त्यावर तक्रार दाखल केली आहे. दरम्यान काही काळ येथे वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळाली असून. काही वाहन यु टर्न घेऊन पर्यायी मार्गाचा वापर करून आपल्या मार्गाला लागले होते. अशा घटना वारंवार घडत असून नागरिकांकडून येथे ओव्हर ब्रिज होण्याची मागणी पुढे येऊ लागली आहे.

Exit mobile version