भीषण अपघात! डंपरने दोन महिलांना चिरडले

। धुळे। प्रतिनिधी।

धुळे शहरात डंपर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे.

धुळे शहरातील चितोड शिवारातील रावेर बारीच्या घाटातून अनिल अहिरे दुचाकीने वंदना प्रकाश अहिरे आणि नर्मदा नथू पवार यांच्यासह जात होते. त्याचवेळी वाळूची वाहतूक करणाऱ्या भरधाव वेगातील एका डंपरने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील वंदना अहिरे आणि नर्मदा पवार यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातातील दुचाकीचालक अल्पवयीन असून तोसुद्धा गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी डंपर चालकाविरोधात धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version