| शिरपूर | प्रतिनिधी |
मुंबई-आग्रा महामार्गावर पळासनेर गावाजवळ कंटेनरचा ब्रेक फेल होऊन एका हॉटेलमध्ये शिरल्यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातात 12 जणांचा चिरडून जागीच मृत्यू झाला आहे. तर, मृतांची संख्या आणखी वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

प्राथमिक माहितीनुसार, मुंबई-आग्रा महामार्गावर शिरपूर तालुक्यातील पळासनेर गावाजवळ मंगळवारी (दि.4) साधारणतः दुपारी 12 वाजताच्या दरम्यान ही अपघाताची घटना घडली. आग्राकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या 14 चाकी कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने या कंटेनरने सुरवातीला समोर चालणाऱ्या दोन वाहनांना उडवलं आणि तो थेट हॉटेलमध्ये शिरला. या भीषण अपघातात 12 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 15 ते 20 जण जखमी झाले आहेत. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत असून मृतांची संख्या आणखी वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून स्थानिकांच्या मदतीने युद्ध पातळीवर मदतकार्य सुरु करण्यात आले आहे.
