हिंदूंवरील अत्याचाराविरुद्ध सकल हिंदू समाज आक्रमक

कोलाड पोलिसांना निवेदन

| कोलाड | प्रतिनिधी |

बांगलादेशात हिंदू समाजावर होणारे अत्याचार, हिंदूंची घरे-दुकाने जालने दिपु चंद्रदास या हिंदू तरुणाची कट्टर नक्षलवाद्यांनी केलेली निर्घृण हत्या या घटनेच्या निषेधार्थ सकल हिंदू समाज कोलाडमार्फत कोलाड पोलीस ठाण्याचे सपोनि नितीन मोहिते यांना या घटना रोखण्यासाठी राजकीय हस्तक्षेप व आंतरराष्ट्रीय दबाव टाकण्यात यावा, अशी मागणी करण्यासाठी निवेदन देण्यात आले.

बांगलादेशात सातत्याने होणारा हिंदूविरोधी हिंसाचार थांबविण्यासाठी भारत सरकारने आता ठोस पावले उचलणे गरजेचे असून, सरकाने त्वरित अंमलबजावणी करावी. बांगलादेशावर तात्काळ आर्थिक, व्यापारीक व राजनैतिक निर्बंध घालावे. बांगलादेशामधील कट्टरतावादी गटांविरुद्ध कठोर आंतरराष्ट्रीय कार्यवाई करण्यात यावी अशी आग्रहाची मागणी सकल हिंद समाजाची आहे. भारताने जागतिक स्तरावर दबाव आणून बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण करावे. बांगलादेशात सातत्याने होणारा हिंदूविरोधी हिंसाचार थांबविण्यासाठी भारत सरकारने आता ठोस पावले उचलणे गरजेचे आहे, असे आंबेवाडी नाका येथे कोलाड पोलिस ठाण्याचे सपोनि नितीन मोहिते यांना दिलेल्या निवेदनात सांगण्यात आले आहे.

यावेळी आंबेवाडी नाका येथे रायगड भुषण हभप मारुती महाराज यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, कळत न कळत का होईना, आपल्या दृष्टीने अतिशय भयंकर गोष्ट आहे. वास्तविक पाहता, या हिंदुत्वावर आघात होणे म्हणजे आपल्या हिंदू देशावर संकट म्हणावे लागेल, यासाठी आपण सर्वांनी सक्षम होणे गरजेचे आहे.

Exit mobile version