कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेला

मतदारांचा कोणाच्या बाजूने कौल

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

रायगड जिल्हा परिषदेच्या 59 आणि पंचायत समितीच्या 118 जागांसाठी शनिवारी (दि.7) सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी 17 लाख मतदारांपैकी 11 लाख 88 हजार 804 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. आता वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचे निकालाकडे लक्ष लागले आहे. सोमवारी (दि.9) सकाळी दहा वाजता तालूका स्तरावर मतमोजणी होणार असून त्यानंतर चित्र स्पष्ट होणार आहे. निकाल प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा व पोलीस प्रशासनाकडून तयारी पूर्ण झाली आहे. अलिबागची मत मोजणी नेहुली येथील क्रिडा संकुलात होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे मतदान शनिवारी उत्साहात व शांततेत पार पडले. सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत 69.91 टक्के मतदान झाले. यावेळी 6 लाख 4 हजार 896 पुरुष मतदारांनी मतदान केले. तर, 5 लाख 83 हजार 904 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे महिलांपेक्षा 20 हजार 992 पुरुष मतदारांनी अधिक मतदान केल्याची आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे अलिबाग तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचे आता निकालाकडे लक्ष लागून राहिले आहे. बंद मशीनमध्ये असलेले 502 उमेदवारांचे भविष्य सोमवारी सकाळी 10 वाजल्यापासून उजाडणार असून कोणाला किती मते मिळाली, हे स्पष्ट होणार आहे.

यावेळी अलिबाग तालुक्यातील मत मोजणी नेहूली येथील क्रीडा संकूलमध्ये होणार आहे. सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. त्यात 20 टेबल असून अकरा फेऱ्या आहेत. त्यासाठी कर्मचारी नेमणूक केली आहे. तसेच, मतमोजणीच्या ठिकाणी कोणताही गैरप्रकार घडू नये, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी रायगड पोलिसांमार्फत कडे कोड बंदोबस्त ठेवला आहे.

अलिबागमधील 63 उमेदवारांचे भवितव्य
अलिबाग तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 7 आणि पंचायत समितीच्या 14 जागांसाठी शनिवारी निवडणूक प्रक्रिया पार पडल्या. यावेळी जिल्हा परिषदेसाठी 21, तर पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी 42 उमेदवार असे एकूण 63 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे मतदारांनी इव्हीएम मशीनमध्ये बंद केलेला आपला कौल आज जगजाहिर होणार आहे. त्यामुळे या 63 उमेदवारांचे भवितव्य मतदारांच्या मर्जीने ठरणार आहे.
मतदारांचा कौल कोणाला
रायगड जिल्हा परिषदेच्या 59 आणि पंचायत समितीच्या 118 सदस्यपदांच्या जागांसाठी निवडणूक पार पडील. काही जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदार संघात दोन उमेदवार, तर काही मतदार संघात चार ते सहा उमेदवारांमध्ये लढत झाली. जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक मतदार संघात पाचपेक्षा अधिक उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे काही ठिकाणी एकमेकांविरोधात चुरशीची लढत, तर काही ठिकाणी एकतर्फी विजय होण्याची अपेक्षा वर्तविली जात आहे. त्यामुळे मतदारांचा कौल कोणाला मिळणार, हे चित्र आज स्पष्ट होणार आहे.
जिल्ह्यात 11 लाख 88 हजार 804
मतदारांनी बजावला हक्क
अलिबाग

स्त्री मतदानः 74 हजार 969
पुरुष मतदानः 76 हजार 814
एकूणः 1 लाख 51 हजार 783
पनवेल
स्त्री मतदानः 95 हजार 638
पुरुष मतदानः 1 लाख हजार 161
इतरः 1
एकूणः 1 लाख 95 हजार 800
कर्जत
स्त्री मतदानः 63 हजार 975
पुरुष मतदानः 66 हजार 776
एकूणः 1 लाख 30 हजार 751
खालापूर
स्त्री मतदानः 41 हजार 97
पुरुष मतदानः 43 हजार 209
इतरः 2
एकूणः 84 हजार 308
सुधागड
स्त्री मतदानः 17 हजार 194
पुरुष मतदानः 18 हजार 531
एकूणः 35 हजार 725
पेण
स्त्री मतदानः 51 हजार 70
पुरुष मतदानः 54 हजार 83
एकूणः 1 लाख 5 हजार 153
उरण
स्त्री मतदानः 41 हजार 854
पुरुष मतदानः 41 हजार 204
इतरः 1
एकूणः 83 हजार 59
मुरुड
स्त्री मतदानः 20 हजार 187
पुरुष मतदानः 19 हजार 502
एकूणः 39 हजार 689
रोहा
स्त्री मतदानः 42 हजार 301
पुरुष मतदानः 45 हजार 467
एकूणः 87 हजार 768
तळा
स्त्री मतदानः 8 हजार 66
पुरुष मतदानः 8 हजार 582
एकूणः 16 हजार 648
माणगाव
स्त्री मतदानः 41 हजार 804
पुरुष मतदानः 44 हजार 21
एकूण 85 हजार 825
म्हसळा
स्त्री मतदानः 11 हजार 624
पुरुष मतदानः 10 हजार 734
एकूणः 22 हजार 358
श्रीवर्धन
स्त्री मतदानः 16 हजार 734
पुरुष मतदानः 14 हजार 879
एकूणः 31 हजार 613
महाड
स्त्री मतदानः 45 हजार 508
पुरुष मतदानः 48 हजार 36
एकूणः 93 हजार 544
पोलादपूर
स्त्री मतदानः 11 हजार 883
पुरुष मतदानः 12 हजार 897
एकूणः 24 हजार 780
Exit mobile version