महायुतीकडे खोक्यांचा चेहरा- नाना पटोलें

| मुंबई | प्रतिनिधी |

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र सामोरे जाणार आहोत. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रासाठी काही मोठा विषय नाही. महायुतीकडे चेहरा आहे का? हा केवळ खोक्यांचा चेहरा असल्याची सडकून टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. यावेळी त्यांनी शिंदे फडणवीस सरकारवर कडाडून हल्लाबोल केला.

दरम्यान, बदलापूर घटनेवर नाना पटोले यांनी भाष्य केले. पटोले म्हणाले की,या सरकारची आता कीव येऊ लागली आहे. याचं राजकारण करायचं नाही याचं भान आम्हाला आहे. सत्तेतील लोक मात्र राजकारण करत आहेत. गुन्हेगार शिंदे, खासदार शिंदे, मारणारा शिंदे, मुख्यमंत्री शिंदे या सगळ्या प्रकरणांमध्ये शिंदे दोषी कसे, अशी खोचक विचारणा नाना पटोले यांनी केली. ते पुढे म्हणाले की महाराष्ट्रामध्ये विविध घटना घडल्या आहेत. देवेंद्र फडणीसांच्या राज्यातही घटना घडल्या आहेत. यांना साधी लाजदेखील वाटत नाही. यावर ते राजकारण करत आहेत. एन्काऊंटर झाला की आत्महत्या झाली याबाबत प्रकरण न्यायालयात आहे. खर्‍या आरोपीला मदत करण्यासाठी माझ्या मुलाला मारले गेल्याचा आरोप आई-वडिलांनी केला असल्याचे नाना पटोले म्हणाले. ही घटना एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस लपवत आहेत. जे दोषी आहेत, त्या सगळ्यांचे एन्काऊंटर करा, अशी मागणी पटोले यांनी केली.

Exit mobile version