। अलिबाग । वार्ताहर ।
राज्य निवडणूक आयोग दि.10 जून 2022 च्या आदेशान्वये राज्यातील 208 नगरपरिषदा व 13 नगरपंचायतीमधील सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम 2022 जाहीर करण्यात आला आहे.
या कार्यक्रमानुसार रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, मुरूड-जंजिरा, उरण, रोहा, महाड, माथेरान, खोपोली व श्रीवर्धन या नगरपरिषदांच्या प्रभागनिहाय अंतिम मतदारयाद्या दि.01 जुलै 2022 पासून नगरपरिषदेच्या कार्यालयात तसेच नगरपरिषदेच्या व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://raigad.gov.in/ या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.