बहुप्रतिक्षित अग्निशमन वाहन दाखल

। तळा । प्रतिनिधी ।

तळा वासीयांना बहुप्रतिक्षित असलेले अग्निशमन वाहन तळा नगरपंचायतीच्या ताफ्यात दाखल झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात शॉर्टसर्किटमुळे आग लागण्याचे तसेच जंगल भागात वणवे लागण्याच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे. काही वेळा आगीचे प्रमाण वाढल्यास आग आटोक्यात आणण्यासाठी रोहा व माणगाव येथून अग्निशमन दलाच्या वाहनाला पाचारण करावे लागत होते. अशावेळी अंतर लांब असल्याने अग्निशमन दलाचे वाहन येईपर्यंत मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले असते. त्यामुळे तळा नगरपंचायतीच्या ताफ्यात स्वतंत्र अग्निशमन वाहन असावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून केली जात होती. त्यानुसार अग्निशमन सेवा बळकटीकरण योजनेअंतर्गत अग्निशमन वाहन तळा नगरपंचायतीच्या ताफ्यात दाखल झाले आहे. त्यामुळे तळा वासीयांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Exit mobile version