। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
सिंधुदुर्ग-चिपी विमानतळाच्या धावपट्टीवर कोल्हा आल्याने मुंबईवरून आलेल्या विमानाला दहा मिनिटे अवकाशात घिरट्या घालाव्या लागल्या. हा प्रकार पायलटच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ विमान पुन्हा आकाशात झेपावले आणि संबंधित यंत्रणेला त्या कोल्ह्याला धावपट्टीवरून बाहेर काढण्यास सांगितले.
चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळाच्या आजूबाजूला कोल्ह्यांचे टोळके आहे. हे कोल्हे भक्ष्यासाठी फिरत असतात. विमानतळाचे उद्घाटन झाल्यानंतर या विमानतळावर पहिल्यांदाच कोल्ह्याचे दर्शन झाले. विमानसेवा सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी या धावपट्टीवर कोल्ह्यांचा वावर दिसला. या विमानतळावर मुंबईवरून विमान येत होते.
कोल्ह्यामुळे विमानाच्या घिरट्या
