| अलिबाग | प्रतिनिधी |
रोहामधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. यातील देवेश सावंत हा आरोपी शिंदे गटातील असल्याची माहिती समोर येत आहे. सत्तेतील कार्यकर्त्यांकडून होत असलेल्या या प्रकाराबाबत नाराजीचे सुर उमटत आहेत.
रायगड जिल्ह्यामध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्याबरोबरच सोशल मिडीयाद्वारे त्यांना बदनाम करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा निंदनीय प्रकार आहे. त्यामध्ये सत्तेतील शिंदे गटातील कार्यकर्त्यांकडूनच एका निष्पाप अल्पवयीन मुलीवर झालेल्या या प्रकारामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. देवेश सावंत (26) हा आरोपी तळवली तर्फे घोसाले येथील रहिवासी आहे. गेल्या तीन महिन्यांपासून रोहा येथील फ्लिप कार्ड कुरिअर कार्यालयात काम करीत आहे. तो शिंदे गटातील कार्यकर्ता म्हणून गेल्या अनेक महिन्यांपासून काम करीत असल्याची माहिती समोर येत आहे. त्याच्या याप्रकारामुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.





