कोरोना मृत्यूने पावलेल्यांच्या वारसांना शासनाकडून सानुग्रह अनुदान मिळणार

पेणमध्ये आढावा बैठक
पेण | वार्ताहर |
कोरोनाने मृत्यू पावलेल्यांच्या वारसांना शासनाकडून 50 हजारांचे सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे. त्या सानुग्रह सहाय्य योजनेची व्यापक प्रचार व प्रसिध्दी होण्यासाठी पेण येथेमिशन वात्सल्य समितीची बैठक बुधवारी सकाळी 11 वाजता तहसिल कार्यालयामध्ये तहसिलदार स्वप्नाली डोईफोडे, यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. बैठकीमध्ये बालविकास प्रकल्प अधिकारी चेतन गायकवाड यांनी माहिती दिली.
कल्पना इंगळे, यांनी पेण तालुकामध्ये बालसंगोपन योजनेअंतर्गत 25 अर्ज प्राप्त झालेले असून त्यापैकी 21 अर्जांना बालकल्याण समितीची मंजूरी मिळालेली आहे. व इतर 4 लाभार्थ्यांच्या अर्जावर कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती दिली.
आंधळे यांनी महसूल विभागामार्फत संजय गांधी निराधार योजनेमार्फत कोविड मध्ये मृत झालेल्यापैकी 2 लाभार्थ्यांना लाभ दिला आहे, अशी माहिती दिली. कोविड-19 या आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकटतम नातेवाईकास 50,000/- सानुग्रह सहाय्य मिळणेकरीता अर्जदाराने स्वतः किंवा सेतू केन्द्र किंवा ग्रामपंचायतीत उडउ-डझत मधून अर्ज करावा असे अवाहन स्वप्नाली डोईफोडे, तहसिलदार यांनी पेणवासीयांना केले आहे.
सदर सभेसाठ . तालुका आरोग्य अधिकारी अपर्णा खेडेकर, ग्राम संवर्धन सामाजिक संस्था अध्यक्ष संतोष ठाकूर,बीडीओ अरुणा मोरे, गट शिक्षण अधिकारी आदी समिती सदस्य उपस्थित होते.

Exit mobile version