रायगडात वंचितची घोडदौड वाढणार; रवींद्र चव्हाण यांचा विश्‍वास

। पाली /बेणस । वार्ताहर ।
येत्या काळात रायगड जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीची संघटनात्मक दमदार घौडदौड असेल असा विश्‍वास नवनिर्वाचित दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.
चव्हाण पुढे म्हणाले की वंचित, शोषित घटक व बहुजनांच्या न्याय हक्कासाठी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केलीं आहे. आता आमची पुढची लढाई वंचितांना सत्तेत बसविण्याची आहे. त्यामुळे येत्या काळात वंचित बहुजन आघाडीचा झंझावात दिसेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.
रायगड जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीच्या प्रचार प्रसार करण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा रेखा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा वंचित बहुजन आघाडीची कार्यकरणी जाहीर कारण्यात आली. संविधानाच्या रक्षण व जतन करण्यासाठी आता आम्हाला एकजुटिने अधिक जागरूक व सतर्क राहुन काम करावे लागेल असे चव्हाण म्हणाले.
यामध्ये महाराष्ट्र प्रदेश बेलदार समाज संघटनेचे अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. महा सचिव सागर भालेराव, सिद्धार्थ सोनावणे, उपाध्यक्ष कुंदन हाटे, सिद्धार्थ जाधव, सचिव म्हणून श्रेयस कांबळे, सपना कांबळे संघटक प्रफुल कांबळे, रायगड जिल्हा सदस्य म्हणून शशिकांत पवार, सल्लागार म्हणून सखाराम सकपाळ यांची निवड करण्यात आली.

Exit mobile version