माणुसकीच्या टीमने दीले मुक्या वासराला जीवदान

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रविवार दिनांक १० जुलै, आषाढी एकादशी दिवशी अलिबाग तालुक्यातील सिद्धेश्वर डोंगरावर ट्रेकिंगसाठी जात असताना माणुसकी प्रतिष्ठान अलिबाग विभाग महिला प्रमुख उज्वला चव्हाण यांना एक गोंडस वासरू खोल दरीत घसरून झाडाच्या फांदीला अडकलेल्या अवस्थेत दिसले.


त्यांनी आपल्या सोबतच्या माणुसकी प्रतिष्ठानच्या टीम सहकाऱ्यांच्या तातडीने ही बाब लक्षात आणून दिली. कोणत्याही परिस्थितीत त्या मुक्या जनावराचे प्राण वाचवले पाहिजेत या उद्देशाने त्या कामाला लागल्या. आपल्या सहकाऱ्यांसह त्या ठिकाणी आलेल्या पर्यटकांना सोबत घेऊन खोल दरीतून त्या वासराला अलगदपणे वर काढले. एवढ्यावरच त्या थांबल्या नाही तर त्यांनी त्या ठिकाणी नेऊन त्याला खायला व पाणी दिले.

आषाढी एकादशी निमित्त या मुक्या वासराला जीवदान देऊन केलेली ही अनोखी सेवा विठ्ठलाच्या चरणी नक्कीच रुजू झाली असेल.

Exit mobile version