टाईम कामगारांचे उपोषण सुरूच

| महाड | प्रतिनिधी |

येथील टाईम टेक्नो प्लास्ट लिमिटेड या कंपनीतील कामगारांनी आपल्या पगारवाढीच्या मागणीसाठी आमरण उपोषण आंदोलन सुरु केले आहे. यातील सहा कामगारांची तब्येत बिघडल्याने रुग्णालयात हलवले आहे. याबाबत अद्याप कंपनी प्रशासनाने आपली कोणतीच भूमिका स्पष्ट केलेली नाही.

टाईम टेक्नो प्लस नावाचा प्लास्टिक ड्रम बनवण्याचा कारखाना आहे. कंपनी प्रशासनाने सन 2016 मध्ये केलेला पगार वाढीचा करार सन 2020 मध्ये संपला आहे. यामुळे नवीन करार करून पगारवाढ केली जावी अशी मागणी कामगारांनी केली आहे. कामगारांच्या सांगण्यानुसार संपलेला कंपनी करार पुढे लागू करण्याकडे कंपनी प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. उलट ठाणे कामगार न्यायालयाकडून कामगारांना नोटीस बजावली आहे. या नोटिसीनुसार कंपनीत काम करायचे असेल तर लागेल ते काम करावे लागेल अन्यथा कंपनी बाहेर व्हावे लागेल असा नोटीस बजावली असल्याचे सांगितले. यामुळे गेली 30 दिवसांहून अधिक दिवस कामगार कंपनीच्या बाहेर आहेत. तीन दिवसांपूर्वी मात्र कंपनी कामगारांनी रीतसर आमरण उपोषणाचा इशारा देत उपोषणात्मक आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस असून अद्याप कोणत्याच प्रकारची चर्चा न झाल्याने यातील काही कामगारांची तब्येत बिघडू लागली आहे.

कंपनी आणि प्रशासनाने योग्य तो मार्ग काढला पाहिजे, कंपनी व्यवस्थापन याबाबत लक्ष देत नाही. कामगारांनी केलेली मागणी रास्त आहे. यामुळे स्थानिक पातळीवरील सर्व राजकीय संघटना देखील कामगारांच्या पाठीशी आहो

संतोष कदम, अध्यक्ष महाड युनिट


Exit mobile version