। श्रीवर्धन । वार्ताहर ।
रायगड जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघांच्या समन्वय समितीचे अध्यक्ष सुरेश पालकर व त्यांच्या पत्नी सुनिता पालकर यांनी 1 ऑक्टोबर रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून देहदानाचा निर्णय घेतला होता. यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे संबंधितांकडे सुपूर्द करण्यात आली आहेत. धर्मादाय कार्याची सुरुवात स्वतःपासून करावी, या हेतूनेच पालकर दाम्पत्यांनी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनी देहदानाचा निर्णय घेऊन जगासमोर एक वेगळाच आदर्श ठेवला आहे.
पालकर दाम्पत्यांचा आदर्श
