। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यात अनंत चतुर्दशीपर्यंत स्थापित झालेल्या गणेश मूर्तींचे विधिवत विसर्जन करण्यात आले. तालुक्यात सर्वत्र शांततेत गणेश विसर्जन सोहळे पार पडले असून तालुक्यातील कर्जत नगरपरिषदेने उल्हास नदीवरील गणेश घाट, नेरळ ग्रामपंचायतीने ब्रिटिश कालीन धरणावरील गणेश घाट आणि दहीवली ग्रामपंचायतीच्यावतीने उल्हास नदी मालेगाव-दहीवली पूल येथे विसर्जन सोहळ्याचे आयोजन केले होते. दरम्यान, कर्जत तालुक्यात घरगुती 1096 तर सार्वजनिक मंडळाच्या 13 बाप्पांना वाजतगाजत निरोप देण्यात आला.