। कोलाड । प्रतिनिधी ।
दहा दिवसांच्या गणपती बाप्पांच्या विसर्जनाला पावसाची मोठी विश्रांती मिळाल्याने गणेश भक्तांनी बाप्पाचा जयजयकार करत ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर’ या अशा जय घोषात भक्तिमय वातावरणात खांब, देवकान्हे विभागातील सार्वजनिक आणि खासगी बाप्पांचे विसर्जन वाजत-गाजत तसेच हरिनामाच्या गजरात गुलालाची उधळण करत आपल्या लाडक्या बाप्पाला मोठ्या भक्ती भावनेने निरोप देण्यात आला.