| रोहा । प्रतिनिधी ।
पंजाब पक्कवडा येथे झालेल्या स्टूंडट ऑलिम्पिकराष्ट्रीय खो-खो स्पर्धेत नेत्रदिपक कामगिरी करुन महाराष्ट्राच्या संघाने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. विजयी संघातील सर्व खेळाडू हे रायगड जिल्हयातील रोहे तालुक्यातील असून सदर संघातील खेळाडू रोहा येथे परतल्यानंतर रोहे मनसेकडून त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी मनसे जिल्हा सचिव अमोल पेणकर, अक्षय रटाटे, सुरज मुटके, मंगेश रावकर, कल्पेश शेळके, रितेश कीर्तने, साहिल दळवी, युवराज निबरें हे उपस्थित होते.
27 ते 30 अॅाक्टोबर या कालावधीत पंजाब येथे स्टूडंट अॅाल्मपिक राष्ट्रीय खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हयातील रोहे तालुक्यातील खेळाडूंचा भरणा असलेल्या महाराष्ट्राच्या संघाने सेमी फायनलच्या सामन्यामध्ये यजमान पंजाब संघाला 22-11 अशा अकरा गुणांच्या फरकाने मात करीत अंतिम सामन्यात प्रवेश मिळविला होता.
अंतिम सामना महाराष्ट्र विरुद्ध आंध्रप्रदेश अशा दोन मातब्बर संघांमध्ये रंगला. अतिशय चुरशीच्या झालेल्या या अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या संघाने 18-13 अशा 5 गुणांनी मात करीत विजेतेपदावर नाव कोरुन सुवर्ण पदकाचा बहूमान पटकावला. या संघामध्ये अनिरुद्ध हरिश्चंद्र जवरत (सानेगाव), साहिल संतोष जाधव (पोफळघर), हितेश राकेश चंदने (सानेगाव), प्रतीक यशवंत जंगम (सानेगाव), हर्षल गणेश कोस्तेकर (कुंभार तळवली), राज सचिन शेलार ( रोहा), विघ्नेश वामन शेळके (झोलांबे), कौशल संतोष मोरे (सानेगाव), मनीष दिनेश माधवी ( यशवंतखार), यश विकास चोघले (यशवंतखार), ऋतिक राजेश मोहिते (कांडणे बुद्रुक), रितेश मंगेश गोवर्धने (अष्टमी), कार्तिक व्यंकटेश मुक्तीपड (धाटाव), पियूष पुंडलिक महाडिक (वावे) या सर्व खेळाडूचे रोहे रेल्वे स्टेशन ते मेहेंदळे हायस्कूल पर्यंत ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले.