तलावाला जलपर्णींचा विळखा

| आपटा | वार्ताहर |

आपटा गावतील असणाऱ्या तलावाची दुरवस्था झाली असून, तलावाला पूर्णपणे जलपर्णींनी विळखा घातला आहे. तलावाच्या बाजूला संरक्षक कठडे नसल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. तरी, या गंभीर प्रश्नाकडे संबंधित विभागाने तात्काळ लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

गेली कित्येक वर्षे तलावाची साफसफाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे संपूर्ण तलावात जलपर्णी मोठ्या प्रमाणात वाढल्या असून, पाण्यावर शेवाळ आल्याने ते दूषित झाले आहे. पाण्याला दुर्गंधी येत आहे. त्याचा आजूबाजूच्या नागरिकांना त्रास होतो आहे. याबाबतीत ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष घालावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Exit mobile version