‘झटपट बोलूया इंग्रजीत’ उपक्रम यशस्वी

संतोष नाटीकरांच्या व्हिडिओला उत्स्फूर्त प्रतिसाद

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील खाड्याचा पाडा या रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक हे बालभारती अभ्यास मंडळाचे सदस्य आहे. इंग्रजी विषयाचे तज्ज्ञ म्हणून अभ्यास मंडळावर नियुक्त असलेले शिक्षक संतोष नाटीकर यांनी इंग्रजी नवोपक्रममधील एका वेगळ्या बदलाचा व्हिडीओ बालभारती अभ्यास मंडळावर शेअर केला. दरम्यान उपक्रमशील शिक्षक संतोष नाटीकर यांच्या या व्हिडीओला राज्यभरातील शिक्षक यांच्याकडून प्रचन्ड प्रतिसाद लाभला आहे.

बालभारती अभ्यासमंडळ सदस्य संतोष नाटीकर हे जिल्हा परिषदशाळा खाड्याचा पाडा येथील उपक्रमशील शिक्षक काम पाहतात. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास साधण्यासाठी संभाषण कौशल्याचे महत्व असाधारण आहे. इंग्रजी भाषा बोलण्यासंबंधी एक रामबाण उपक्रम म्हणजे ‘झटपट बोलूया इंग्रजीत’ असा हा उपक्रम आहे. कर्जत तालुक्यातील खाड्याचापाडा येथील शाळेवर कार्यरत शिक्षक संतोष नाटीकर यांचा हा उपक्रम सध्या कर्जत तालुक्यातील अनेक अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे आकर्षण बनला आहे. मुलांनी आकलनपूर्वक अस्खलित इंग्रजी बोलावे यासाठी 20-60 दिवसाचा हा उपक्रम अनेक शाळांमध्ये यशस्वी ठरलेला दिसतो आहे. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवन्यासाठी असे उपक्रम शाळांमध्ये राबवणे गरजेचे आहे. याबाबत पंचायत समिती कर्जतचे गटशिक्षणाधिकारी अनंत खैरे यांनी या नवोपक्रमास शुभेच्छा दिल्या आहेत. भविष्यात हा उपक्रम विद्यार्थ्यांना प्रेरणादायी व इंग्रजी विषयाचे ज्ञान वाढण्यास मदत करणारा ठरणार आहे. संतोष नाटीकर यांनी आजपर्यंत अनेक शाळांमध्ये तज्ञ मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन केले आहे.

विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला
इंग्रजी विषय अभ्यासमंडळ सदस्य संतोष नाटीकर यांनी आपल्या इंग्रजी विषयाच्या ज्ञानाचा फायदा सर्वसामान्य व तळागाळातील विद्यार्थ्यांना व्हावा यासाठी एक नवोपक्रम राबविला आहे. या उपक्रमामुळे वाडीवस्तीवरील, गाव खेड्यातील, तांडा, पाडद्यावरील विद्यार्थ्यांना खूप फायदा झाल्याचं सिद्ध झाले आहे. विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाची भीती दूर होण्यास मदत झाली असून, त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. संपूर्ण राज्यभरातील विद्यार्थ्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून आम्हाला या नवोपक्रमाचा खूप फायदा झाल्याचे सांगितले.
Exit mobile version