पाकिस्तान संघाचा जीव भांड्यात

| न्युयॉर्क | वृत्तसंस्था |

भारतीय संघाने टी-20 विश्वचषकाच्या ग्रुप स्टेजमधील सामन्यात अमेरीका विरूद्धच्या विजयाबरोबरच सुपर 8 मधील आपले तिकीट निश्चित केले. भारताच्या या विजयाने पाकिस्तानला मात्र मोठा दिलासा मिळाला आहे.

टी-20 विश्वचकात पाकिस्तानचा संघ खराब कामगिरी करत आहे. त्यांना अमेरीका आणि भारताकडून पराभव पत्करावा लागला होता. या दोन पराभवांमुळे त्यांचे सुपर 8 मधील प्रवेश लटकला आहे. त्यांना भारत-अमेरीका सामन्यात काय होते यावरही त्यांच गणित अवलंबून होते. अमेरीकेला फक्त एक सामना जिंकायचा होता. मात्र, भारताने अमेरीकेला चांगल्या पद्धतीने मात दिल्याने पाकिस्तानचे आव्हान एक दिवस का असेना अबाधित राहिले आहे. मात्र, असे असले तरी अमेरीकेने आयर्लंडला मात दिली तर पाकिस्तानचे सुपर 8 गाठण्याचे स्वप्न भंगणार आहे.

अमेरीका चार गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांचे नेट रनरेट हे +0.127 इतके आहे. मात्र, भारताने अमेरीकेचा पराभव केला अन्‌‍‍ पाकिस्तानने कॅनडाचा पराभव केल्यानंतर चित्र थोडे बदलले आहे. पाकिस्तानचे नेट रनरेट हे +0.191 इतके झाले आहे. हे अमेरीकेपेक्षा चांगले नेट रनरेट आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या सुपर 8 च्या आशा वाढल्या आहेत. मात्र, तर अमेरीकेने आयर्लंडचा पराभव केला तर पाकिस्तानचा खेळ खल्लास होणार आहे.

Exit mobile version