कमी उत्पन्नाने फणसाच्या किमती वाढल्या

। रेवदंडा । प्रतिनिधी ।
वटपौर्णिमा चार दिवसावर आली असतानाच बाजारात सर्वत्र फणस विक्रीसाठी आले आहेत.मात्र यावेळी उत्पन्न कमी झाल्याने फणसाची तसेच सुट्या गर्‍यांची किंमती वाढल्याचे दिसत आहे.
यावर्षी फणसाचे उत्पन्न फारच कमी आले असल्याचा बागायतदाराचे म्हणणे आहे, त्यामुळे नेहमी पेक्षा बाजारात विक्रीसाठी फणस फारच कमी प्रमाणात उपलब्ध असल्याची तक्रार विक्रेता करतोय त्यामुळे वटपौर्णिमेला फणसाची मोठी मागणी लक्षात घेता, फणसाची उपलब्धता कमी असल्याने आपोआप फणसाचे दर वाढले असल्याचे बाजारात फेरफटका करताना दिसतो.
आजपर्यंत शंभर,दीडशे, व दोनशे रूपये किमंतीची विक्री असलेले फणस सध्या बाजारात तिनशे, चारशे व पाचशे रूपयांच्या विक्री दर आहे. बाजारात फणसाची खरेदी करणाारे ग्राहक वाढलेल्या दराने खुपच नाराज झाला आहे. वटपौर्णिमेला महिलावर्गाची फणसाच्या गरांसाठी खुपच मागणी असते. गेल्या दोन वर्षात चक्री वादळ,अतिवृष्टीने बागायतदाराचे खुपच नुकसान झाले, बागायतीमध्ये चाळीस ते पन्नास फुट उंचीचे असलेले फणसाची झाडे कोळमडून पडली, यामुळे फणसाचे नेहमीचे उत्पन्नाचे प्रमाण प्रतिवर्षा पेक्षा फारच कमी आहे, बागायतदाराना तर मोठया आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागले आहे,परिणामी बाजारात फारच अल्प प्रमाणात फणस विक्रीसाठी आले असून फणस कमी व मागणी जास्त असल्याने फणसाच्या किमंतीत वारेमाप वाढ झाली असल्याचे चित्र दिसते.

Exit mobile version