घरात घुसून केली मंगळसूत्राची चोरी

। माणगाव । प्रतिनिधी ।

माणगाव नगरपंचायत हद्दीतील दत्तनगर भागात फिर्यादी यांच्या घरामध्ये रूम नं.204, सी विंग, आश्रम शाळा रोड, शिक्षक कॉलनी याठिकाणी घरफोडी करुन 65 हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून अज्ञात चोरटा फरार झाला आहे. ही चोरी सोमवार, दि.29 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 ते 5 वाजण्याच्या दरम्यान घडला. याबाबतची फिर्याद विश्‍वनाथ हुल्लनाईक तालिमकर (52) रा. शिक्षक कॉलनी दत्तनगर माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.

या गुन्ह्याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास माणगाव पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस नाईक एन.एस. धनावडे या करीत आहेत.

Exit mobile version