१५ हजार रक्कम घेऊन अज्ञात चोरटा फरार
। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव शहरात घरफोड्यांचे धाडसत्र सुरूच असून सातत्याने चोऱ्या होत असल्याचे समोर येत आहे. माणगाव शहरात घरफोडीचे धाडसत्र सुरूच असून शहरातील जुने माणगाव परिसरातील महादेव स्टील बिल्डिंग मटेरियलच्या दुकानातून अज्ञात चोरट्याने १५ हजार ३०० रुपयांची चोरी केली. हि घटना रविवारी (दि.२६) रात्री २ वाजताच्या सुमारास घडली असून याबाबत रामजीलाल चतराजी माली (वय-४६) रा.विद्यानगर जुने माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
या गुन्ह्याची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक श्री. खिरीट हे करीत आहेत.