| धाराशिव | प्रतिनिधी |
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला रविवारी, (दि.4) ऑगस्ट सुरुवात झाली आहे. या दौऱ्याची सुरुवात धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथून करण्यात आली. दरम्यान, राज ठाकरे थांबलेल्या हॉटेलमध्ये मराठा कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत घोषणाबाजी केली.
मनसे प्रमुख राज ठाकरे थांबलेल्या हॉटेल परिसरात मराठा कार्यकर्ते घुसले असून गोंधळ घालत घोषणाबाजी करत आहे. राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका जाहीर करावी, अशी मागणी मराठा कार्यकर्त्यांनी केली आहे. यासाठी कार्यकर्त्यांनी हॉटेलमध्येच ठिय्या मांडला आहे. सोलापूरमध्ये आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्यावरून मराठा समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आता राज ठाकरे काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.