शेकाप मध्यवर्ती समितीच्या बैठकीला सांगोल्यात प्रारंभ

। अलिबाग । माधवी सावंत ।
शेतकरी कामगार पक्षाच्या मध्यवर्ती समितीच्या बैठकीला शनिवारी दुपारी 2 वाजता शेकाप सरचिटणीस आम.जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्रारंभ झाला आहे. या बैठकीत पुढील दोन दिवस पक्षबांधणीच्या कामाचे नियोजन तसेच सर्वसामान्य जनतेच्या प्रश्‍नांसाठी आंदोलनाची आखणी करणे आदी महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा केली जाणार आहे.शेतकरी कामगार पक्षाच्या मध्यवर्ती बैठकीला रायगड जिल्ह्यातून पक्षाचे सुमारे 500 प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित राहिले असल्याची माहिती शेकाप जिल्हा चिटणीस अ‍ॅड. आस्वाद पाटील यांनी दिली.बैठकीच्या प्रारंभी ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख,क्रांतीवीरांगणा हौसाक्का पाटील,सुलभाकाकू पाटील आदी मान्यवरांना आदरांजली वाहण्यात आली.

Exit mobile version