भारताच्या मिशन आदित्य-एल1 चा मुहूर्त
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
चंद्रावर चांद्रयान-3 चे यशस्वी लँडिंग करून इतिहास रचणाऱ्या इस्रोने आता सूर्यावर स्वारी करण्याचा निर्धार केला आहे. यासाठी 2 सप्टेंबरला आदित्य-एल1 मिशन श्रीहरिकोटा येथून सकाळी 11.50 वाजता प्रक्षेपित होईल. लॉन्चिंग पाहण्यासाठी सर्वसामान्य नागरिकही नोंदणी करू शकतात. गॅलरीत बसून प्रक्षेपण पाहण्यासाठी इस्रोने आपल्या वेबसाइटवर नोंदणी लिंक देखील जाहीर केली आहे. इस्रोने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ही पहिली भारतीय अंतराळ मोहीम असेल.
या मिशनमध्ये हवामानाची गतीशीलता, सूर्याचे तापमान, अतिनील किरणांचा पृथ्वीवर होणारा परिणाम आणि ओझोन थर यांचा अभ्यास केला जाणार आहे. सूर्याचा अभ्यास करून हवामानाचा अंदाजही अधिक अचूक होईल, असा शास्त्रज्ञांचा विश्वास आहे. यामुळे अशी यंत्रणा तयार होण्यास मदत होईल, ज्याद्वारे वादळाची माहिती तात्काळ मिळेल आणि त्याची सूचना देता येईल.असे इस्त्रोने सांगितले आहे.