रागात मुलाला घेऊन आई बेपत्ता

| पनवेल | वार्ताहर |

नवीन पनवेल सेक्टर 6 येथून पतीने मारल्याचा राग मनात धरून पत्नीने आपल्या एक वर्षाच्या मुलाला सोबत घेऊन बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. याबाबत पतीने खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

फिरोजा बेगम राजू दास असे या बेपत्ता महिलेचे नाव असून तिचा रंग सावळा, उंची 5 फूट आहे. तिने अंगात आकाशी रंगाचा कुर्ता आणि काळ्या रंगाची लेगीज घातलेली आहे. तिच्या पायात लाल रंगाची लेडीज चप्पल आहे. तिच्यासोबत तिचा मुलगा मोंटू, त्याचा रंग सावळा व तो अंगाने सडपातळ आहे. त्याच्या अंगात आकाशी रंगाचा टी-शर्ट आणि हाफ पॅन्ट घातलेली आहे. यांच्याबाबत अधिक माहिती असल्यास पोलीस हवालदार नवनाथ नरळे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version