खालापूर प्रेस क्लबतर्फे तहसीलदारांना निवेदन
। पाताळगंगा । वार्ताहर ।
मुंबई-गोवा महामार्गाला आद्य पत्रकार तथा दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव द्यावे या मागणीसाठी कोकणातील सर्व तालुक्यातील पत्रकारांनी 17 मे रोजी स्थानिक पातळीवर तहसिलदारांना निवेदन देऊन आपली भूमिका मांडली असून खालापूर प्रेस क्लबने ही खालापूरचे तहसीलदार आयुब तांबोळी यांना या आशयाचे निवेदन पत्र दिले.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार भाई ओव्हाळ, खालापूर प्रेस क्लब अध्यक्ष प्रशांत गोपाळे, सचिव रविंद्र मोरे, खजिनदार मुकुंद बेंबडे, प्रसिद्धीप्रमुख समाधान दिसले, सहसचिव राज साळुंखे, सदस्य नवज्योत पिंगळे आदी उपस्थित होते.
बाळशास्त्री जांभेकर हे कोकणचे सुपूत्र आहेत आणि पत्रकारांमुळे हा महामार्ग होत असल्याने बाळशास्त्रींचे महामार्गाला नाव देणे औचित्यपूर्ण ठरणार असल्याने सरकारने तातडीने तसा निर्णय घ्यावा अशी मागणी केली असून शासनाचे पुन्हा लक्ष केंद्रीत व्हावे यासाठी संपूर्ण कोकणातील पत्रकारांनी 17 मे रोजी स्थानिक पातळीवर तहसिलदारांना निवेदन देऊन या मार्गाला मुंबई – गोवा महामार्गाला दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव देण्याची मागणी केली असून याच अनुषंगाने खालापूर प्रेस क्लबने तहसिलदारांना निवेदन देऊन आपली भूमिका मांडली आहे.