इशानचे अर्धशतक वाया; दमदार सलामीनंतर पराभव
| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबईच्या संघाने जिंकणारा सामना गमावला. मुंबईने झोकात सुरुवात केली आणि त्यांनी 90 धावांची सलामी दिली. पण, रोहित शर्मा बाद झाला आणि त्यानंतर इशान आणि सूर्यकुमारही लवकर तंबूत परतले. मुंबईच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी हाराकिरी केली आणि तिथेच हा सामना मुंबईच्या हातून निसटला. लखनौच्या संघाने मुंबईपुढे विजयासाठी 178 धावांचे आव्हान ठेवले होते. पण मुंबईच्या संघाला 172 धावा करता आल्या आणि त्यांना पाच धावांनी पराभव पत्करावा लागला.
लखनौच्या 178 धावांचा पाठलाग करताना मुंबईच्या संघाने आश्वासक सुरुवात केली. रोहितने यावेळी 25 चेंडूंत 37 धावांची खेळी साकारली. त्यामुळे मुंबईच्या संघाला 10 षटकांत 90 धावांची सलामी देता आली. इशानने यावेळी आपले अर्धशतक मात्र पूर्ण केले. पण अर्धसतकानंतर तो जास्त काळ फलंदाजी करू शकला नाही. इशानने 39 चेंडूंत आठ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 59 धावांची खेळी साकारली. त्यानंतर सूर्यकुमार यादवही सात धावांवर बाद झाला आणि त्यामुळे सामना अधिक रंगतदार झाला.
सूर्यकुमार यादव याला मोठी खेळी करता आली नाही. सूर्यकुमार यादव अवघ्या सात धावा काढून तंबूत परतला. यश ठाकूर याने सूर्याचा अडथळा दूर केला. सूर्याकुमार यादव याच्यानंतर नेहला वढेरा आणि टिम डेविड यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण मोठा फटका मारण्याच्या प्रयत्न वढेरा बाद जाला. नेहल वढेरा 16 धावांवर बाद झाला. या खेळीत वढेरा याने दोन चौकार लगावले. विष्णू विनोद दोन धावांवर बाद झाला. निकोलस पूरन याने जबराट झेल घेत विष्णू विनोदचा डाव संपुष्टात आणलाय.
चांगल्या सुरुवातीनंतर मुंबईच्या फलंदाजांनी हराकिरी केली. सुर्यकुमार यादव, नेहल वढेरा, विष्णू विनोद यांना मोठी खेळी करता आली नाही. टिम डेविड याला फिनिशिंग करता आली नाही. डेविड 32 धावांवर नाबाद राहिला. लखनौकडून रवि बिश्नोई आणि यश ठाकूर यांनी भेदक मारा केल. दोघांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या.