संगीत मैफलीने जिंकली कर्जतकरांची मने

। कर्जत । प्रतिनिधी ।

द स्वरबरसात इव्हेंट प्रस्तुत ‘ये शाम मस्तानी’ या संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. या मैफलीत गायकांनी सादर केलेल्या मराठी, हिंदी नवीन जुन्या गीतांनी कर्जतकरांची मने जिंकली.

या मैफलीत सूर निरागस, माय भवानी, शंभो शंकरा, विठ्ठल आवडी, शारद सुंदर, मन उधाण वार्‍याचे, गोमू संगतीन, अजीब दासता हैं आदी अशी गीते गायक अभिषेक नलावडे, मंदार भिडे, सई जोशी, प्रीती जोशी यांनी सादर केली. त्यांना तबल्यावर यश हजारे, ढोलकीवर प्रसाद पाठारे, ऑक्टोपॅडवर प्रवीण भोपी, सिंथेसायझर वर अभिषेक जहागीरदार आणि नरेंद्र सकटे यांनी साथ संगत दिली. निवेदन समीर खरे यांनी केले.

याप्रसंगी भाई गायकर, मनोहर थोरवे, संभाजी जगताप, पंकज पाटील, अभिषेक सुर्वे, संकेत भासे, प्रसाद थोरवे, उत्तम शेळके, शिवराम बदे, रोहित विचारे, तात्या रुठे आदींसह मोठ्या संख्येने संगीत प्रेमी उपस्थित होते.

Exit mobile version