। उरण । वार्ताहर ।
उरणमधील चिकन विक्रेते नरेश भोईर यांच्या घरी स्थानापन्न झालेल्या गणरायाची अज्जू भाईंनी मनोभावे पूजा करुन बाप्पाचे दर्शन घेतले. मुस्लिम बाधवांमध्येही आपल्या गणरायाबद्दल प्रेम वाढू लागले आहे. त्यामुळेच गणपतीची मनोभावे पूजा करणारे अनेक मुस्लिम कुटुंब आहेत. मुंबईतील एका मुस्लिम बांधवांनी मुलगा झाला तर घरात गणपती मांडेन असा नवस केला होता. त्याला मुलगा होताच त्यांनी घरात गरणरायाची स्थापना करून मनोभावे पूजाअर्चा केली.
तसेच उरणमधील सुप्रसिद्ध चिकन विक्रेते नरेश भोईर यांच्या येथे स्थानापन्न झालेल्या गणरायाची मनोभावे पूजा करताना त्यांच्याकडेच काम करणारा अज्जू भाई हा मुस्लिम बांधव दिसत आहे. यावरून आता हिंदू व मुस्लिम समाजातील बांधव आपले सण एकमेकांच्या सहकार्याने साजरा करण्याकडे कल वाढत चालला असल्याचा प्रत्यय यानिमित्ताने दिसून येत आहे.