रोहा येथे 13 ऑगस्टला होणार राष्ट्रीय लोकन्यायालय

। नागोठणे । वार्ताहर ।

तालुका विधी सेवा समितीॅमार्फत रोहा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात शनिवारी 13 ऑगस्ट राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले. या लोकन्यायालयात रोहा न्यायालयातील प्रलंबित तडजोड पात्र खटले, दिवाणी दावे, वाद्पूर्व प्रकरणे, वित्तीय संस्था, बी.एस.एन.एल., ग्रामपंचायती, नगरपरिषद, बँका, वीज वितरण कंपनी यांच्याकडील वाद्पूर्व प्रकरणे तडजोडीने मिटविण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत. तरी संबधित सर्व नागरिकांनी आपली प्रकरणे लोकन्यायालयात ठेवून निकाली काढली तर वेळेचा व पैशांचा होणारा अपव्यय टाळता येईल. याशिवाय आपापसांतील वाद कायमस्वरूपी सामोपचाराने मिटून तात्काळ न्याय मिळेल. त्यामुळे सर्व पक्षकारांनी आपापली जास्तीत जास्त प्रकरणे लोकन्यायालयाच्या माध्यमातून निकाली काढण्यासाठी लोकन्यायालयाचा लाभ घेऊन सहकार्य करावे असे आवाहन तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष एस.एस. महाले यांनी केले आहे.

Exit mobile version