समाजाच्या उन्नतीसाठी शिक्षणाची गरज

तहसीलदार आयुब तांबोळी
चौक | वार्ताहर |
समाजाच्या उन्नतीसाठी शैक्षणिक पात्रता गरजेची असून, आपल्या समस्या व शैक्षणिक कार्यासाठी सर्वोतोपरी मदत महसूल विभाग करील, अशी ग्वाही नवनिर्वाचित तहसीलदार आयुब तांबोळी यांनी दिली.
सालाबादप्रमाणे जंगल सत्याग्रह व हुतात्मा दिनानिमित्त खालापूर येथील आदिवासी भवनात आदिवासी दिन साजरा करण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमात हुतात्मा नाग्या महादू कातकरी चिरनेर सत्याग्रह, हुतात्मा बिरसा मुंडा जंगल सत्याग्रह व हुतात्मा भागोजी भागरे जंगल सत्याग्रह यांच्या प्रतिमेस तहसीलदार आयुब तांबोळी व नायब तहसीलदार राजश्री जोगी यांच्या हस्ते पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप डाके, प्रस्तावना कैलास पवार यांनी केली. स्थानिक आदिवासी नेते मारूती पवार, जयवंत शिद, शकुंतला पवार, संतोष जाधव, लक्ष्मण वाघमारे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. बबन पवार, अनंता वाघे, रवी होला, शंकर होला तसेच आदिवासी युवक यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मदत केली. कार्यक्रम कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्व शासकीय नियमांचे पालन करून मोजक्याच निमंत्रित लोकांच्या करण्यात आला.

Exit mobile version