आधाराबाबत आदिवासींमध्ये जनजागृतीची गरज

। सारळ । वार्ताहर ।
सर्वसामान्य व ग्रामीण जनतेला वैशीष्टपूर्ण ओळख देण्यासाठी प्रशासनाने आधारकार्डच्या रूपाने एका चांगल्या मार्गाचा अवलंब केला. पण ग्रामीण भागात मात्र आधारकार्डबाबत अजूनही हवी तशी जागृती दिसत नसल्याचे चित्र अनेकठिकाणी दिसत आहे. परिणामता नवीन आधारकार्ड काढणे अनेक वर्षाचे जुने आधारकार्ड नूतनीकरण करणे या प्रक्रीयेपासून ग्रामीण भागातील समाज पूर्णपणे मागे आहे. आजही ग्रामीण भागातून पूर्णपणे अद्यावत नसण्याचे आधारकार्डचे प्रमाण 80 टक्के नक्कीच मिळेल. नवीन आधारकार्ड काढणे, तसेच मुलांचे वय वर्ष 5 व 15 झाल्यावर त्याचे बायोमेट्रिक (हाताचे ठसे) बदलणे फोटो बदलणे गरजेचे असते. याबाबत अजूनही ग्रामीणभाग पूर्णपणे अज्ञानात आहे. आज अनेक ठिकाणी नागरी सेवा केंद्र आहेत. मात्र त्याच्याकडून याबाबत जनजागृती होताना दिसत नाही. अदिवासी समाजात तर याबाबत भयंकर अज्ञान आहे. त्यामुळे त्या समाजात अनेक लहानमुलांन सोबतच पालकांची आधारकार्ड दिसत नाहीत तर काही पालकांचे आधार अद्यवत नाहीत. तरी नगरपालिका, ग्रामपंचायत, संस्था समाजसेवक यांच्या माध्यमातून डाक विभागाकडे प्रस्ताव ठेऊन याबाबतची शिबीर भरवली गेली तर ग्रामीण जनतेला गावातच ही सुविधा उपलब्ध होऊ शकेल अशी भावना नागरिकांनकडून व्यक्त होत आहे.

Exit mobile version