। सुतारवाडी । वार्ताहर ।
कोरोना काळात अनेक सण साजरे झालेच नाहीत. त्यामुळे अनेकांना निराशा पत्करावी लागली. कोकणात इतर सणांपेक्षा होळी सणाला जास्त महत्व दिले जाते. कामानिमित्त शहरात गेलेल्या व्यक्ती आवर्जून आपल्या गावाकडे येतात. या वर्षी 17 मार्चला होळी सण येत आहे. सध्या ग्रामीण भागात होळी सणासाठी अनेक जण तयारीला लागले असून अनेकांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्साह दिसत आहे. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी या वर्षी होळी सणाचा आनंद सर्वत्र दिसणार आहे.