नव्या पिढीला दर्जेदार शिक्षण आवश्यक

| मुरुड जंजिरा | वार्ताहर |

अलिकडे इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु करून सातत्याने गुणवत्ता राखत चालविणे हे खरोखर धाडसाचे काम आहे. मुलांची शारीरिक व बौद्धिक जडण घडणीत करत असतांना भविष्याचा वेध घेऊन नव्या पिढीला दर्जेदार शिक्षण देणे हे आव्हानात्मक काम असल्याचे प्रतिपादन खा. सुनील तटकरे यांनी केले. मुरुड येथील नचिकेताज इंग्रजी माध्यम शाळेच्या नूतन वास्तुचे उदघाटन करतांना उपस्थितांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर अतिक खतीब, मंगेश दांडेकर, मुग्धा दांडेकर, सुबोध महाडिक, सुभाष महाडिक, स्मीता खेडेकर, अविनाश दांडेकर, कल्पना वाघमारे, प्राचार्य डॉ. मेहबूब नगरबावडी, डॉ. विश्‍वास चव्हाण, प्रमोद देशमुख, नितीन पवार, प्राचार्य योगेश तंटक, अजित गुरव, जैन समाजाचे अध्यक्ष हसमुख जैन आदी मान्यवर उपस्थित होते .

प्रास्ताविक मंगेश दांडेकर म्हणाले की, दोन वर्षापूर्वी निसर्ग चक्रीवादळात दोनदा शाळेचे प्रचंड नुकसान झाल. कोणतीही संस्था चालवतांना पैशांचे सोंग आणता येत नाही. नविन शाळेची उभारणी करतांना रायगड जिल्हा बँकेचे चेअरमन आ. जयंत पाटील यांनी ट्रस्ट मार्फत आर्थिक सहकार्य केले. तसेच फुले पतसंस्थेने वित्त पुरवठा केल्याबद्दल जाहीर आभार व्यक्त केले. माजी शिक्षण सभापती नितीन पवार यांनीही मनोगत व्यक्त केले. माजी विद्यार्थीनी श्रृती पवार हिने शाळा व शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. सूत्रसंचालन नितीन पवार यांनी तर आभार प्रदर्शन योगेश तंटक यांनी केले. सदरील कार्यक्रमात स्वर्गीय आण्णा बनकर व सुहेल मोदी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सदरील कार्यक्र्मसाठी असंख्य मान्यवर व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Exit mobile version